भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
राजकारण

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…

पंढरपूर : अजित पवारांच्या उपस्थितीत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सभा झाली. अजित पवार गुरुवारी त्यानिमीत्त पंढरपुरात होते. दरम्यान अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे भाषणावेळी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मास्क काढा अशी चिठ्ठी पाठवणाऱ्या कार्यकर्त्यालाही त्यांनी चिमटा काढला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नेमकं काय घडलं?
अजित पवारांचं भाषण सुरु असतानाच त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली. अजित पवारांनी यावेळी सर्वांसमोर चिठ्ठी वाचून दाखवत दादा मास्क काढा, आवाज व्यवस्थित येत नाही असं लिहिलं असल्याचं सांगितलं. मी मास्क काढत नाही, का तर मी जनतेला सांगतोय मास्क लावा. म्हणून मी मास्क लावून बोलतोय… तरी हा शहाणा सांगतो मास्क काढा. याला काय जातं सांगायला, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्याला सुनावलं.

दरम्यान, यावेळी भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावरूनही अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. भाजपा सोडू नये म्हणून काही नेत्यांनी दोन तीन दिवस कल्याणरावांच्या घरी जाऊन बसायचे. त्याआधी कल्याणरावांची आठवण आली नाही. पण जेव्हा कळालं की, कल्याणराव काळे साहेबांकडे चालले, की काही जणांच्या पोटात दुखायला लागलं. अरे तुला कुठं घालायची घाल ना… आम्हाला त्यात काय करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.