धक्कादायक ! दाक्षिणात्य अभिनेत्रीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
मनोरंजन

धक्कादायक ! दाक्षिणात्य अभिनेत्रीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वीजे चित्राचे निधन झाले आहे. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चित्राच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. ती केवळ २८ वर्षांची होती. चित्राने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्राचा अलिकडेच प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघं एकत्रदेखील रहात होते. हेमंत रवी यांनीच चित्राच्या मृत्यूची माहिती दिली. “इवीपी फिल्मसिटीमधील शुटींग संपल्यावर चित्रा हॉटेलमध्ये आली आणि आंघोळीला जाते सांगून बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, त्यामुळे मी दार वाजवलं. पण आतून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर मी हॉटेल स्टाफला सांगून डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी चित्राचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला”,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या रूममध्ये चित्राचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस या प्रकरणाची माहिती घेत आहेत. आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर चित्राने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधेय ती खूप आनंदी दिसत आहे. मात्र १२ तासांत असे नक्की काय घडले की तिने आत्म्हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. असा प्रश्न आता उद्भवला आहे.

दरम्यान, पांडियन स्टोर्स’ या मालिकेतील चित्राची भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेत तिने मुलई ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे चित्रा प्रकाशझोतात आली होती. त्यांमुळे तिच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे.