गायक गुरु रंधावाने केला साखरपुडा; कोण आहे ती मिस्ट्री गर्ल
मनोरंजन

गायक गुरु रंधावाने केला साखरपुडा; कोण आहे ती मिस्ट्री गर्ल

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक कलाकारांनी आपल्या साखरपुड्याची, लग्नाची तर कोणी बाळाची अशा अंदाच्या बातम्या दिल्या आहेत. तर नुकताच हिंदी- पंजाबी गायक गुरु रंधावाने देखील साखरपुडा केल्याची चर्चा रंगली आहे. गुरू रंधावाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केल्यानंतर त्याच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील त्याचे अभिनंदन केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुरू रंधावाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गुरू एका मुलीचा हात पकडून मोकळेपणाने हसत असल्याचं दिसून येत आहे. पण या फोटोमध्ये त्या मुलीचा चेहरा दिसत नाही आहे. फक्त फोटो नाही तर गुरूने दिलेल्या कॅप्शनमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. “नवीन वर्ष, नवीन सुरूवात” अशा आशयाचं कॅप्शन गुरूने त्या फोटोला दिलं आहे. त्यामुळे तो त्या मुलीसोबत लग्नबंधनात अडकणार की काय असे प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. अनेकांनी त्याला शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. मात्र ही मिस्ट्री गर्ल कोण आहे आणि त्याने खरंच साखरपुडा केलाय का यावर गुरूने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

https://www.instagram.com/p/CJtI8a_lifu/?utm_source=ig_web_copy_link

नवीन वर्षाच्या सुरूवातीला गुरूने हा फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या आधी गुरू रंधावा आणि नोरा फतेही यांचे ‘नाच मेरी राणी’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. दरम्यान, गुरु रंधावाच्या या पोस्टनंतर अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडीसने त्याला ‘अभिनंदन’ करत शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु रंधावांनी पाटोला, हाय रेटेड गॅब्रू, सूट-सूट्स, बन जा तू मेरी रानी, ​​लगडी लाहोर दी या सारखी अनेक गाणी गायली आहेत. अलीकडेच त्याचा नवीन व्हिडिओ नाच मेरी राणी प्रसिद्ध झाला आहे. यात त्याच्यासोबत नोरा फतेही आहे.