पतीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मिटिंग सुरु असतानाच पत्नीने केलं असं काही की…
मनोरंजन

पतीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मिटिंग सुरु असतानाच पत्नीने केलं असं काही की…

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक कंपन्यानी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी परवानगी दिली आहे. अनेकांना वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आवडतही आहे. तर लोकांना आता वर्क फ्रॉम होमचा कंटाळा येऊ लागला आहे. कुटुंबीयांसोबत राहूनच ऑफिसचं काम करताना अनेक अडचणींना समोर जावं लागत आहे. सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडिओज आपण पहिले असतील.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या सहकाऱ्यांशी बोलत असतना अचानक त्याची पत्नी तिथे येते. तिला आपल्या पतीला किस करण्याचा मोह होतो आणि ती तसा प्रयत्न करते. यावेळी पतीची झालेली घालमेल कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झालीय. आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला मजेशीर रिप्लाय येत आहेत. व्हिडीओ शेअर करताना रुपिन शर्मा यांनी ‘वर्क फ्रॉम होम के खतरे’ असं हिंदीत कॅप्शन दिलंय. या व्हिडीओला त्यांनी 13 फेब्रुवारीला शेअर केलं होतं.

नक्की काय झालं व्हिडीओत ?
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक व्यक्ती आपल्या सहकाऱ्यांना संबोधित करत आहे. ही मिटिंग सुरु असताना अचानक त्याची पत्नी तिथे येते आणि आपल्या पतीला किस करण्याचा प्रयत्न करते. यावेळी पती प्रचंड अस्वस्थ होतो. तो पत्नीवर चिडतो आणि काय सुरुय? कॅमेरा सुरु आहे, असं तो व्यक्ती तिला म्हणतो. त्यानंतर तो पुन्हा मिटिंगला जॉईन होतो. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. या व्हिडीओवर अनेकजण मजेशीर कमेंट करत आहेत. “जेव्हा मिटिंगमध्ये असाल तेव्हा खोलीचा दरवाजा बंद करायचा. पण या व्यक्तीच्या प्रेमळ पत्नीला खरंच मानलं पाहिजे”, अशी कमेंट एका यूजरने दिली आहे.