चेन्नई : आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत रविचंद्रन अश्विनने मोठी झेप घेतली असून त्याला पाचव्या स्थानावर बढत मिळाली आहे. तर फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी कायम आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विन ८०४ गुण मिळवून सातव्या स्थानी कायम आहे तर चेन्नई क्रिकेट कसोटीत विश्रांती घेतलेल्या जसप्रीत बुमराहने ७६१ गुणांसह आपले आठवे स्थान कायम राखले. ९०८ गुण मिळवून पॅट कमिन्सने अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत वेस्ट इंडीजच्या जेसन हॉल्डरने प्रथम स्थान मिळविले आहे. भारताच्या रविंद्र जडेजाने दुसरे (४०३ गुण), इंग्लंडच्या बेन स्टोक्सने तिसरे (३९७ गुण), बांगलादेशच्या शाकिब अल हसनने चौथे स्थान(३५२ गुण) तर अश्विनला ३३७ गुण मिळाले आहेत.
R Ashwin is the new No.5 all-rounder in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings 💪
Full list: https://t.co/OMjjVx5Mgf pic.twitter.com/HWEyIRqovo
— ICC (@ICC) February 17, 2021
चेन्नईत इंग्लंड विरूध्द झालेल्या दुसऱ्या कसोटीत अश्विनने भारताच्या दुसर्या डावात शानदार १०६ धावा फटकावल्या आणि आपल्या ऑफ स्पिन शैलीने आठ गडी बाद केले, ज्यात भारताने ३१७ धावांनी विजय मिळविला होता.