पंजाब सरकारचा मोठा निर्णय; सोनू सूदकडे सोपविली ही जबाबदारी
मनोरंजन

पंजाब सरकारचा मोठा निर्णय; सोनू सूदकडे सोपविली ही जबाबदारी

चंदीगड : जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशा पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून अभिनेता सोनू सूदवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पंजाब प्रशासनाने अभिनेता सोनू सूदला कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काल सोनू सूदची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी सोनूला आपल्या घरी आमंत्रित केलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले, लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित कऱण्यासाठी सोनूसारखा दुसरा रोल मॉडेल असू शकत नाही. पंजाबच्या लोकांमध्ये लस घेण्यासंदर्भात भीती आणि शंका असल्याचं दिसून येत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, त्यांनी गेल्या वर्षी अनेक लोकांची मदत केली आणि त्यामुळे जगभरात त्यांचं नाव झालं, त्यामुळे लोकांच्या त्यांच्यावर विश्वास आहे. या पंजाब दा पुत्तरने लोकांना लसीकरणाचं महत्त्व समजावल्यास लोक त्यांचं नक्की ऐकतील. सोनू सूदही या नव्या जबाबदारीसाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. तो म्हणाला, मी या मोहिमेसंदर्भातली कोणतीही भूमिका मनापासून बजावेन आणि माझ्या राज्यातल्या लोकांचा जीव वाचवण्याचं काम करण्यात धन्यता मानेन.