ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज; एकदा पाहाच
मनोरंजन

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज; एकदा पाहाच

मुंबई : ऋषी कपूर यांचे गेल्या वर्षी निधन झाले. मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी ऋषी कपूर यांना त्यांच्या एका अर्धवट राहिलेल्या चित्रपटात पाहण्याची संधी लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ४ सप्टेंबर रोजी शर्माजी नमकीन या चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमावरून प्रदर्शित करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऋषी कपूर यांची कन्या रिधिमा हिने या खास चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमांवरून प्रदर्शित केले. ऋषी कपूर यांच्या प्रति असलेलं प्रेम, आदर, त्यांच्या आठवणी जागवतानाच त्यांची भूमिका असलेल्या अखेरच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत असल्याचे रिधिमाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ऋषी कपूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चाहत्यांना दिलेली ही खास भेट असल्याचेही तिने नमूद केले आहे. एक्सेल एन्टरटेन्मेटची निर्मिती असलेल्या शर्माजी नमकीनचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी के ले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट झाले असतानाच त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे या चित्रपटातील त्यांची भूमिका स्वीकारून राहिलेला चित्रपट पूर्ण करण्याची विनंती अभिनेता परेश रावल यांना करण्यात आली होती. त्यांनीही लगेचच होकार दर्शवत चित्रपट पूर्ण केल्याबद्दल रिधिमाने परेश रावल यांचेही आभार मानले आहेत. ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू यांनी मात्र या खास दिवशी आपल्या पतीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.