अभिनेत्रीच्या आईचे कोरोनामुळे निधन
मनोरंजन

अभिनेत्रीच्या आईचे कोरोनामुळे निधन

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारामुळे दररोज असंख्य मृत्यू होत असून हा आकडाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. छोट्या पडद्यावरची अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. याबद्दल रिद्धिमाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रिद्धिमाच्या आई ६८ वर्षांच्या होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनेक वर्षांपासून त्या किडनीच्या समस्येने त्रस्त होत्या. आपल्या आईला गमावल्याचं दुःख तिने एका पोस्टमधून व्यक्त केलं आहे. यात ती म्हणते, मम्मा, मॉम्झी, छोटी बेबी, अशीच मी तुला हाक मारायचे. मी तुला खूप जास्त मिस करत आहे पण मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. तुझ्यासोबतच घालवलेला प्रत्येक क्षण तू आमच्यासाठी मागे सोडला आहेस. तुझं संपूर्ण आयुष्य तू आमच्यासाठी वेचलंस. त्यासाठी तुझे आभार.

रिद्धिमा पुढे लिहिते, मी आता माझ्या मित्रमैत्रिणींना हे सांगू शकणार नाही की आईने बनवलेलं गुजराती जेवण पाठवतेय… मी कधी तुझ्याकडून स्वयंपाकही नाही शिकले. कुणास ठाऊक माझी मुलं आता काय खातील? पण मी मात्र स्वतःला अजूनही लहान मूलच समजते. हा विचारही करवत नाही की आता मी तुझ्या हातची चव चाखू शकणार नाही. रिद्धिमाच्या भावूक करणाऱ्या या पोस्टवर तिच्या अनेक मित्रांनी आणि सहकलाकारांनी सांत्वनपर कमेंट्स केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनीही तिचं सांत्वन केलं आहे.