अशी आहे रसिका सुनील आणि आदित्य बिलागी’ची लव्हस्टोरी
मनोरंजन

अशी आहे रसिका सुनील आणि आदित्य बिलागी’ची लव्हस्टोरी

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी शनाया म्हणजेच रसिका सुनील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. रसिकाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर एका तरुणासोबत फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोनंतर त्याच्याबद्दल अनेक चर्चा होऊ लागल्या होता. त्यानंतर रसिकाने स्वतःच त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. तिने एका मुलाखतीमध्ये “होय, मी आदित्य बिलागीला डेट करत असल्याचे तिने सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी रसिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिची आदित्यशी ओळख झाली असून या दोघांमध्ये जवळीक वाढली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://www.instagram.com/p/CLRQ-KAn-y5/?utm_source=ig_web_copy_link

रसिका आणि आदित्यने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्याच्या नात्याबाबत बोलताना तिने सांगितले होते की, आम्ही दोघंही सध्या लॉस एंजिलिसमध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत. मी खूप आनंदी आहे” या मुलाखीतमध्ये त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे. तेव्हा रसिका म्हणाली, ‘दीड-दोन वर्षे आम्ही मित्रमैत्रीण म्हणून आहोत. आम्ही मागच्या वर्षीच प्रेमात पडलो. त्यामुळे आम्ही प्रेमात पडलो अन् कोरोना आला असं काही तरी झालं. हा जानेवारीमध्येच भारतात आला. मी त्याला घ्यायला एअपोर्टला गेले होते. तेव्हा त्याच्या मनात काही तरी सुरु होतं.

एकदिवस तो मला म्हणाला मला तुला काही सांगायचं आहे. पण खूप मोठा प्रॉब्लम आहे. मला काही कळेना की प्रॉब्लम काय आहे. कारण मी त्या नजरेने त्याला पाहत नव्हते. पण मला तो आवडयाचा आधीपासून. पण मित्र होता त्यामुळे असा विचार केला नव्हता. त्यानंतर एक दिवस आम्ही एका पार्टीला गेलो. माझे काही मित्रमैत्रीणी अमेरिकेहून आले होते. त्यांच्यासोबतच आम्ही पार्टीला गेलो होतो. त्यानंतर तेथून निघताना मला जाणवलं कि याला काय बोलायचं आहे मला कदाचित कळालं आहे. म्हणून मी याला किडनॅप करुन बँडस्टाइनला घेऊन गेले.’

आदित्य मूळचा औरंगाबादचा आहे. गेली ९ वर्षे तो अमेरिकेत राहत आहे. तो सीनीअर सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तसेच तो कमाल डान्सर आहे. त्याचे स्वत:चे युट्युब चॅनेल आहे.पुढे आदित्य म्हणाला, ‘आम्ही मस्त फिरत होतो. नंतर कॉफी प्यायला गेलो. तिथे वरतून विमानं उडत असताना आम्ही ती बघत होता आणि ती विमाने पाहून तिला बाबांची आठवण येते असं ती म्हणत होती. कारण तिचे बाबा अमेरिकेत असतात. तेव्हा मी माझ्या मनातलं सांगितलं की प्रॉब्लम हाच आहे की मी पण चार आठवड्यात जाणार आहे पुन्हा अमेरिकेला. तेव्हा तिला मी थोडी आयड्या दिली की तू मला आवडते.’

दरम्यान, रसिका आणि आदित्य बिलागीने अतिशय फिल्मी स्टाईलने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन केले आहे. रसिकाने या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये रसिका आणि आदित्य शॅम्पेन फोडताना दिसत आहे. हे दोघे कुठच्यातरी डोंगरावर हे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. त्यांच्यामागे हेलिकॉप्टरही दिसत आहे. यात रसिका सुनीलने काळ्या रंगाची शिफॉनची साडी नेसली असून यात ती खूपच हॉट दिसत आहे. ‘माझा कायमचा व्हॅलेंटाईन आदित्य बिलागी..आम्हा दोघांकडून तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम आणि व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा’ असे रसिकाने या पोस्टखाली लिहिले आहे.