कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ; आज राज्यात ४ हजार रुग्णांची भर
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ; आज राज्यात ४ हजार रुग्णांची भर

गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ९२ करोनाबाधित रुग्ण वाढले. तर, १ हजार ३५५ जण करोनातून बरे झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९५.७ टक्के झाले आहे. तर, राज्यात एकूण ३५ हजार ९६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात आतापर्यंत १९ लाख ७५ हजार ६०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात करोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद महाराष्ट्रात असून या पार्श्वभूमीवर पुणे औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. आगामी अर्थसंकल्पात या औंध साथरोग रुग्णालयाची घोषणा केली जाईल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. तसेच, महाराष्ट्रात करोनाचे आजपर्यंत २० लाख ६० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले, तर ५१ हजाराहून अधिक रुग्णांचे मृत्यू झाले. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील रुग्ण व मृत्यूंचे प्रमाण कितीतरी जास्त आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात करोनाचे आजपर्यंत २० लाख ६० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले, तर ५१ हजाराहून अधिक रुग्णांचे मृत्यू झाले. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील रुग्ण व मृत्यूंचे प्रमाण कितीतरी जास्त आहे.राज्यात हिवताप, मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लूसह वेगवेगळे साथीचे आजार एकीकडे तर वाढते असंसर्गजन्य आजार दुसरीकडे असे चित्र असले तरी गेल्या दशकात साथीच्या आजारांपेक्षा मधुमेह, व उच्च रक्तदाबासह असंसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वेगाने वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर औंध उरो रुग्णालयात ६०० खाटांचे सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात २०० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी साथरोग प्रशिक्षण, संशोधन, उपचार व संदर्भ सेवा यांची व्यवस्था असणार आहे. यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच, भारतातील वेगवेगळ्या साथीच्या आकाराप्रमाणे जगभरातील साथीचे आजार व उपचार तसेच संशोधन कामावर या साथरोग रुग्णालयातील संशोधन केंद्रातून अभ्यास केला जाणार आहे.