सनी लिओनीने केली फसवणूक? पोलिसांत तक्रार दाखल
मनोरंजन

सनी लिओनीने केली फसवणूक? पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई : एका कार्यक्रमासाठी अभिनेत्री सनी लिओनीने लाखो रुपये घेतले. मात्र, त्या कार्यक्रमासाठी गैरहजर राहुन तिने फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावर केरळमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता तिची चौकशी करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी शुक्रवारी केरळ पोलिसांकडून सनीची चौकशी झाली असून कार्यक्रमाच्या आयोजकांनी सनी लिओनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेत्री सनी लिओनीला केरळमधील कोच्ची येथे दोन कार्यक्रमांसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यासाठी सनीने कार्यक्रमाच्या आयोजकांकडून लाखो रुपयांचा अॅडव्हान्सदेखील घेतला होता. मात्र, ऐनवेळी सनी या कार्यक्रमाला गैरहजर राहिली. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सनीने या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आयोजकांकडून २९ लाख रुपये अॅडव्हान्समध्ये घेतले होते.

कोरोना काळ सुरु असल्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. तसंच आयोजकांकडून या कार्यक्रमात ५ वेळा बदल करण्यात आला. तसंच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी २९ लाख नव्हे तर, १२ लाख रुपये घेण्यात आले होते. जे लवकरच परत करण्यात येतील, असं स्पष्टीकरण सनी लिओनी आणि तिच्या वतीने देण्यात आलं आहे.