बॉलिवूड अभिनेत्याच्या बायकोने शेअर केला बाथरुम सेल्फी
मनोरंजन

बॉलिवूड अभिनेत्याच्या बायकोने शेअर केला बाथरुम सेल्फी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका आणि चित्रपट निर्माती ताहिरा कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ताहिराने यावेळी बाथरुम फोटो शेअर करत स्वत:च्या शरीराची तुलना जगप्रसिद्ध पॉपस्टार केंडल जेनरसोबत केली आहे. तिचा हा फोटो लक्षवेधी ठरत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अलीकडेच केंडल जेनरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये तिनं अभिनेत्री किम कदार्शियनसोबत एक जाहिरात केली होती. या फोटोवर निशाणा साधत ताहिरानं स्वत:ची तुलना केंडलसोबत केली आहे. माझं शरीर केंडलपेक्षा वजनदार आहे. परंतु या वजनदार शरीराचे देखील अनेक फायदे आहेत. असा टोला तिने लगावला.

केंडलचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. तिचा हा फोटो पाहून इतर महिलांप्रमाणेच मी देखील माझ्या शरीराची तुलना तिच्यासोबत करत होते. माझं शरीर तिच्यासारखं स्लीम ट्रिम होऊ शकतं का? तिचं शरीर नक्कीच आकर्शित करणारं आहे. पण तिनं परिधान केलेल्या त्या कपड्यांमध्ये माझ्या शरीराचा लहानसा भाग देखील झाकला जाणार नाही. मी एका 69 किलो वजनाच्या महिलेला पाहिलं आहे. जिनं एका पर्वतासारखं उभं राहून ताकदीनं एक वजनदार दरवाला उघडला होता. मला देखील या वजनदार शरीरामुळं हिरो असल्याचा भास होतो. अशा आशयाची एक लांबलचक पोस्ट ताहिराने लिहिली आहे. सोबत तिनं स्वत:चा एक बाथरुम सेल्फीदेखील शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत तिच्या फोटोचो कौतुक केलं आहे.