हरभजनचा चित्रपट येतोय; एकदा ट्रेलर पाहाच
मनोरंजन

हरभजनचा चित्रपट येतोय; एकदा ट्रेलर पाहाच

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तो लवकरच फ्रेंडशिप या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकताच त्याच्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हरभजनने ट्विटर अकाऊंटवर फ्रेंडशिप चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने शार्प, क्रिस्प, इंटेन्स.. माझा आगामी चित्रपट फ्रेंडशिपचा टीझर प्रदर्शित असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटाचा टीझर तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये हरभजनचा अनोखा अंदाज पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. तसेच सोशल मीडियावर हरभजनच्या अभिनयची प्रशंसा केली जात आहे. या चित्रपटात अॅक्शन सीन्सचा भरणा असल्याचे दिसत आहे.

फ्रेंडशिप या चित्रपटाचे दिग्दर्शन पॉल राज आणि सूर्या करत आहेत. यामध्ये अर्जुन आणि तमिळ बिग बॉस फेम अभिनेत्री लोसलिया मारियानेसन ही अभिनेत्री दिसणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.