ईडीची मोठी कारवाई; बॉलिवूड अभिनेत्याला अटक
मनोरंजन

ईडीची मोठी कारवाई; बॉलिवूड अभिनेत्याला अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला सक्तसवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या १०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती. सचिन जोशीने विजय मल्ल्याचा गोव्यामधील किंगफिशर व्हिला खरेदी केला आहे. याशिवाय अनेक शहरांमध्ये रेस्तराँ आणि क्लब असणाऱ्या प्लेबॉय फ्रॅचाइजीचा तो मालक आहे. ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी सचिन जोशीला ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र समन्स बजावल्यानंतही सचिन जोशी ईडी कार्यालयात हजर झाला नव्हता. यानंतर त्याला चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणण्यात आलं होतं.

सचिन जोशीने मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी शर्मासोबत लग्न केलं आहे. तेलुगू, कन्नड तसंच काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. पान मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या खाद्य परफ्यूमची निर्मिती करणं हा सचिन जोशीच्या जे एम जोशी ग्रुपचा मुख्य व्यवसाय आहे. याशिवाय रेस्तराँ आणि मद्य व्यवसायही या ग्रुपकडून केला जातो. आयकर विभागानेदेखील गेल्या आठवड्यात सचिन जोशीच्या निवासस्थानी आणि कार्लयांची छापा टाकला होता. ईडीने याआधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली आहे.