उषा नाईकांची छोट्या पडद्यावर दमदार एण्ट्री; ‘या’ मालिकेत साकारणार सासूबाईंची भूमिका
मनोरंजन

उषा नाईकांची छोट्या पडद्यावर दमदार एण्ट्री; ‘या’ मालिकेत साकारणार सासूबाईंची भूमिका

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक या छोट्या पडद्यावर दमदार एंण्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. स्टार प्रवाहवरील मालिका फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत उषा नाईक या काकीसाहेबांची भूमिका साकारणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मराठी कलाविश्वाला अनेक गाजलेले चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री उषा नाईक हे नाव कोणत्याही मराठी रसिकाला नवीन नाही. अनेक चित्रपट सुपरहिट केल्यानंतर उषा नाईक या फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत झळकणार आहेत. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी किर्तीकडे १५ दिवस आहेत. जीजी अक्कांनी तिला १५चं दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, आता हा अवधी आता संपत चालला आहे. जर या दिवसात किर्ती स्वत:ला सिद्ध करु शकली नाही. तर तिला घर सोडून जावं लागणार आहे. यातच आता घरात काकीसाहेबांची एण्ट्री होणार आहे.

जीजी अक्कांप्रमाणेच काकीसाहेबांचादेखील घरात धाक असणार आहे. त्यांच्या शब्दाबाहेर घरातील एकही व्यक्ती जात नाही. त्यामुळे त्यांच्या येण्यामुळे किर्तीला आणखी कठोर परीक्षा द्यावी लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच, सध्या या मालिकेत पुढे काय घडणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.