रहस्यमय ‘भंवर जिंदगी’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच
मनोरंजन

रहस्यमय ‘भंवर जिंदगी’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गणेश यादव आणि कमलेश सावंत यांच्या रहस्यमय ‘भंवर जिंदगी’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात स्त्रीया मानसिक तसेच शारीरिक समस्यांना कशा सामोरे जातात. त्यांच्यावर कोणती परिस्थिती उद्भवते. या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी हे एक उत्तम कथानक आहे. तसेच, या सिनेमात बॉलिवूड अभिनेता गणेश यादव आणि कमलेश सावंत विशेष भूमिकेत झळकणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रॉयल समृद्धी असोसिएट प्रेझेंट ‘भंवर’ सिनेमाचा टिझर नुकताच सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला. बॅलन्स, पॉस्को ३०७, रंभ अशा सिनेमांचे दिग्दर्शन स्वरूप सावंत याने केले आहे. भंवर या सिनेमात त्याने लेखन, दिग्दर्शनासह, अभिनेता म्हणून देखिल काम केले आहे. या सिनेमाच्या कथानकाबद्दल स्वरूप सांगतो, “भंवर या सिनेमाचे लेखन माझ्यासह केशव कल्याणकर आणि साकेत लाड सावनगीकर यांनी केले आहे. स्त्रीयांवर होणारे अत्याचार, त्यांच्यावर लहानपणापासून केलेले जाच यावर भाष्य करणारे हे कथानक आहे. या सिनेमात बॉलिवूडचा स्टार गणेश यादवसह, कमलेश सावंत, श्रेया पासलकर, तन्मयी सावर्डेकर या दिसणार आहेत.

रॉयल समृद्धी असोसिएट प्रेझेंटस, स्वरूप सावंत दिग्दर्शित, वैशाली बाळासाहेब सावंत आणि श्रीकांत बालघरे निर्मीत भंवर हा सिनेमा नोव्हेंबर २०२१ रोजी जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच या सिनेमाचा दुसरा भाग केव्हा प्रदर्शित होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.