सैफिनाच्या घरी बाळाचे आगमन; कपूर-खान कुटुंबात जल्लोष
मनोरंजन

सैफिनाच्या घरी बाळाचे आगमन; कपूर-खान कुटुंबात जल्लोष

बॉलीवू अभिनेत्री करीना कपूर-खानच्या घरी दुसऱ्यांदा बलाचे आगमन झाले आहे. अभिनेता सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि करीनाचे वडील रणधीर कपूर यांनीच करीनाला दुसरा मुलगा झाल्याचे सांगितले आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये करीनाने बाळाला जन्म दिला. संपूर्ण कपूर आणि खान कुटुंबीयांनी अतिशय आनंदानं त्यांच्या बाळाचं स्वागत केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज सकाळी 9 वाजता करिनाला मुलगा झाला आहे. यामुळं आम्ही सर्वजण फार आनंदात आहोत. तिनं दुसर्‍या मुलाला ब्रीच कॅंडी रुग्णालयात जन्म दिला आहे, आम्ही तिकडे जात असल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं. अनेक सेलिब्रिटी किड्सप्रमाणंच करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माचा विषयही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला आहे. तर भारतीय चित्रपट जगतामधील प्रतिष्ठीत अशा कपूर कुटुंबातील लेक करीना आणि नवाबांच्या कुटुंबातील सैफ अली खान या सेलिब्रिटी जोडीच्या बाळाची बातमी कळताच सोशल मीडियापासून ते अगदी मित्रमंडळींच्या वर्तुळापर्यंत सर्वच ठिकाणहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहेत.

हिंदी कलाविश्वातील एक नावाजलेली आणि तितकीच चर्चेत असणारी ही जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होण्याचं सुख अनुभवत आहे. यापूर्वी त्यांना तैमूर हा एक मुलगा आहे. आता नव्या बाळाचं नाव, नवी ओळख, नावामागचं कारण अशा अनेक चर्चांना आतापासूनच उधाण येण्यास सुरुवात झाली आहे.

खरतर आपल्या भारतीय संस्कृतीत गरोदरपणात स्त्रीला जास्त धावपळ करण्यास सक्त मनाई असते. तिला हव्या असलेल्या नको असलेल्या गोष्टीची काळजी घेतली जाते. पण दुसऱ्यांदा मातृत्त्व अनुभवणारी करीना तिच्या गरोदरपणाच्या काळातही प्रचंड चर्चेत होती, ती म्हणजे तिच्या अनोख्या स्टाईल स्टेटमेंटमुळं. मैत्रीणींसोबत वेळ घालवण्यापासून  कुटुंबातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत होती. त्यामुळं गरोदरपणात आपल्या वेगळ्याच अंदाजाने ती आपल्या चाहत्यांची मनंही जिंकत होती.

तर दुसरीकडे आता खान कुटुंबात बाळाचे आगमन झाल्याने बाबा सैफ अली खानने त्याच्या आगामी चित्रपट, सीरिज आणि चित्रीकरणाच्या सर्व कामांतून सुट्टी घेण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. आपल्या नवजात बाळासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला सैफ प्राधान्य देणार आहे.