आईने दागिने गहाण ठेवून शिक्षण केलं पूर्ण; सौंदर्यवती मान्या सिंहचा संघर्षमय प्रवास
मनोरंजन

आईने दागिने गहाण ठेवून शिक्षण केलं पूर्ण; सौंदर्यवती मान्या सिंहचा संघर्षमय प्रवास

तेलंगणाची मानसा वाराणसीने ‘फेमिना मिस इंडिया २०२०’चा खिताब जिंकला. मिस इंडियाचा खिताब जिंकल्यानंतर 23 वर्षांच्या मानसाची सर्वत्रच चर्चा रंगली आहे. पण तिच्यासोबत मणिका शोकंद ‘मिस ग्रँड इंडिया 2020’ ठरली आणि मान्या सिंह ही ‘मिस इंडिया 2020’ची रनरअप ठरली आहे. यातील मान्या सिंहचा इथपर्यंतचा प्रवासही वाखाणण्याजोगा आहे. मान्या ही अतिशय गरीब कुटुंबातील असून तिने तिच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मान्या’ने तिच्या या संघर्षाविषयी एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. आपल्या संघर्षाविषयी सांगताना ती म्हणाली की, माझ्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. कधी कधी आम्हाला खायला देखील मिळायचे नाही. माझे वडील रिक्षा चालवून घर चालवायचे. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मी खूप कमी वयात काम करायला सुरुवात केली. त्यामुळे मला माझे शिक्षण देखील पूर्ण करता येत नव्हते. अखेरीस माझ्या आईने तिचे दागिने गहाण ठेवून माझे डिग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मी दिवसा अभ्यास करायचे आणि रात्री लोकांच्या घरी भांडी घासायला जायचे. तसेच मी कॉल सेंटरमध्ये देखील काम केले आहे. माझ्या आई-वडील आणि भावाने दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी इतके यश मिळवू शकले. त्यामुळे मी नेहमीच त्यांची आभारी राहीन.” अशा भावना तिने व्यक्त केल्या.

दरम्यान, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाचा मिस इंडिया कॉन्टेस्ट ऑनलाईन आयोजीत करण्यात आला होता. मिस इंडियाचे हे ५७ वे पर्व होते. फेमिना मिस इंडिया २०२०चे आयोजन मुंबईतील हयात रिजेंसी हॉटेलमध्ये करण्यात आले होते. अभिनेत्री वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अभिनेता अपारशक्ति खुराणा आणि पुलकित सम्राट यांनी हजेरी लावली होती. तर अपारशक्तिने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले होते. पुलकित सम्राट आणि चित्रांगदा या फिनालेचे पॅनलिस्ट होते. तर वाणी स्टार परफॉर्मर होती.