भाजप कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या; चारही आरोपींना अटक
देश बातमी

भाजप कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या; चारही आरोपींना अटक

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्याची त्याच्याच घरात घुसुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. मंगलपुरी परिसरात ही घटना घडली असून पीडित रिंकू शर्मा हा भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हल्ल्यात जखमी झालेल्या रिंकू शर्माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपी नसरुद्दीन, इस्लाम, झाहीद आणि मेहताब यांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, रिंकू आणि शेजारी राहणाऱ्या नसरुद्दीन यांच्यात काही धार्मिक वक्तव्यावरुन वाद काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. बुधवारी रात्री नसरुद्दीन आणि इतर तिघे जबरदस्ती घरात घुसले आणि रिंकूच्या पाठीवर चाकूने वार केला.

पोलिसांनी व्यवसायिक वादातून हत्या झाल्याची माहिती दिली असताना विश्व हिंदू परिषद मात्र राम मंदिरासाठी निधी जमा करण्यावरुन हत्या झाल्याचा दावा करत आहे. आतापर्यंत तपासात मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान रेस्तराँ बंद करण्यावरुन हा वाद झाला होता. सर्वजण एकमेकांना ओळखत होते आणि एकाच परिसरात राहत होते. हत्येमागे इतर कोणतं कारण असल्याचा दावा चुकीचा आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.