छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद
देश बातमी

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. तर दहा जवान जखमी झाले आहेत. छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहीद जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जिल्हा राखीव पोलीस दलातील २० कर्मचारी मंगळवारी नक्षलवादविरोधी मोहीम आटोपून खास बसद्वारे नारायणपूरकडे परतत होते. कदेनार आणि कान्हरगावदरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटाद्वारे ही बस उडवली. त्यात चालकाबरोबरच पाच पोलीस शहीद झाले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली.

याआधी छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात पाच पोलीस शहीद झाले, तर १४ जण जखमी झाले होते.