सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट; या महत्वाच्या व्यक्तीला अटक
मनोरंजन

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट; या महत्वाच्या व्यक्तीला अटक

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. एनसीबीने आता त्याचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. त्याला हैद्राबादमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण लागले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या प्रकरणात सीबीआयही तपास करत होती. त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. सुशांतला आपला भाऊ शौविक चक्रवर्तीच्या मदतीने ड्रग्स पुरविल्याचा आरोप तिच्यावर होता. या प्रकरणाला अनेक वळणं मिळत होती. या प्रकरणातून पुढे अनेक सेलिब्रिटींना तपासाला सामोरं जावं लागलं होतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागे काय कारण होते हे अद्याप समजलेले नाही. मात्र नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असा अंदाज आहे.