राखी सावंत’ने शेअर केला फनी व्हिडिओ; श्रीदेवीच्या नागीण गाण्यावर डान्स होतोय व्हायरल
मनोरंजन

राखी सावंत’ने शेअर केला फनी व्हिडिओ; श्रीदेवीच्या नागीण गाण्यावर डान्स होतोय व्हायरल

बिग बॉस 14’ च्या सिझनमध्ये राखी सावंत सर्वात मनोरंजक स्पर्धक होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत जाणारी ती एकमेव चॅलेंजर होती. टॉप 5 मध्ये जागा पक्की केल्यानंतर 14 लाख रुपये घेऊन राखीने शो सोडला. मात्र शो सोडल्यानंतरही राखी काहीना काही करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. यासाठी राखी सोशल मिडीयावर रोज व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राखीने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे नगीना चित्रपटातील गाणे रिक्रीएट केले आहे. तिचा हा मजेदार व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडत आहे. तर यावेळी राखीला चक्क नागीण बनण्याची इच्छा झाली. राखीने ‘नगीना’ चित्रपटाच्या गाण्यात श्रीदेवीच्या चेहऱ्याच्या जागी स्वत:चा चेहरा मॉर्फ केला आहे. राखीचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना हसू आवरत नाहीय.

https://www.instagram.com/p/CMMAKqUncSJ/?utm_source=ig_web_copy_link

‘मला श्रीदेवीजी खूप आवडतात. माझा आवडता चित्रपट ‘नागीन’ आहे. जर हा चित्रपट पुन्हा तयार करायचा झाला, तर मग कोणाला कास्ट करावे? आपली निवड कमेंटमध्ये शेअर करा,’असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे. राखीने अलीकडे एका मुलाखती दरम्यान एका मोठा खुलासा केला होता. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना माझ्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा होता, असे तिने सांगितले होते.

बिग बॉस 14’मध्ये जाण्याची संधीबाबत तिने ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ”सलमान खान व सोहेल खान यांच्यामुळेच मिळाली. सोहेल भाईने माझी खूप मदत केली. मी त्यांना मॅसेज केला होता. मला इंडस्ट्रीत काम करायचे आहे. मला ‘बिग बॉस’मध्ये जायचे आहे. काम मागण्यात मला काहीही लाज वाटत नाही, असे मी त्यांना म्हणाले होते. कदाचित सोहेलभाईने सलमान भाईपर्यंत माझा मॅसेज पोहोचवला असावा, असे राखी म्हणाली होती.