हार्ट अटॅक ठीक 1 महिना आधी देतो त्याच्या येण्याचे संकेत, ही 12 लक्षणे दिसल्यास व्हा सावध..!
लाइफफंडा

हार्ट अटॅक ठीक 1 महिना आधी देतो त्याच्या येण्याचे संकेत, ही 12 लक्षणे दिसल्यास व्हा सावध..!

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो त्याचा धोका दिवसागणिक वाढत चालला आहे आणि हल्ली लाखो लोकांचा मृत्यू या भयंकर आजाराने होतो. हार्ट अटॅकमुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते आहे. ही एक आकस्मिक घटना आहे. त्यामुळे हार्ट अटॅक कधी येईल ते सांगता येत नाही असे अनेकजण म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का हार्ट अटॅक येण्यापूर्वी सुद्धा शरीराला काही संकेत मिळतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुरुवातीला एक झटका मिळतो आणि तिथूनच हार्ट अटॅकला खरी सुरवात होते. नुकतेच 500 पेक्षा अधिक स्त्रियांवर एक स्टडी करण्यात आला ज्यामध्ये असे दिसून आले की हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधीपासूनच शरीर आपल्याला काही धोक्याचे संकेत देऊ लागते. नक्की काय आहे ही माहिती? आज आपण या लेखातून हीच महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

काय म्हणते स्टडी?
जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, हार्ट अटॅक येण्याच्या एक महिन्या आधीपासूनच लक्षणे दिसू लागतात. या निरीक्षण प्रक्रियेत तब्बल 500 पेक्षा अधिक स्त्रिया समाविष्ट होत्या. ज्या हार्ट अटॅक मधून बचावल्या होत्या. त्यापैकी 95 टक्के महिलांना आपल्या शरीरात एक महिना आधीपासूनच काही बदल जाणवू लागले. हे बदल म्हणजे खरे तर हार्ट अटॅक येणार आहेत याचे संकेत वा लक्षणे होती. 71 टक्के स्त्रियांनी थकवा जास्त येतो असे सांगितले, 48 टक्के महिलांनी झोपेशी निगडीत समस्या जाणवतात असे सांगितले. तर अन्य स्त्रियांनी छातीदुखी, छातीवर दाब येणे, वेदना ही लक्षणे जाणवत असल्याचे सांगितले.

हार्ट अटॅकची लक्षणे
तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे ही माहित असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सत्ता चिंता सतावणे, ह्रदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या निर्माण होणे यासर्वगोष्टी म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. ही दिसू लागल्यावर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हार्ट अटॅकची कारणे
लक्षणे तर आपण पाहिली पण हार्ट अटॅक नक्की कशामुळे येऊ शकतो जे जाणून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा, मधुमेह, हाय कोलेस्टेरॉल, हाय बिपी, धुम्रपान, मद्यपान, हाय फॅट डायट ही सर्व हार्ट अटॅकची कारणे ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही या सर्व कारणांकडे लक्ष दिले पाहिजे. शक्य तितके जास्त हेल्दी जगा, हेल्दी खा आणि तंदुरुस्त रहा. यामुळे तुम्हाला असलेला हार्ट अटॅकचा धोका खूप जास्त कमी होऊ शकतो आणि तुम्ही अधिक काळ निरोगी आयुष्य जगू शकाल.

स्वत:चा कसा बचाव करावा
आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की स्वत:ला हार्ट अटॅक पासून वाचवावे कसे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे हृदय सुरक्षित राखायचे असेल तर आहारावर लक्ष द्या. सध्या धकाधकीच्या काळात हेल्दी आहाराकडे लक्ष राहत नाही आणि हेच हार्ट अटॅकला आमंत्रण ठरू शकते. शिवाय तुम्हाला धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर ही सवय सोडा. कोणत्याही प्रकारे धुम्रपान आणि मद्यपानाचे समर्थन करता येणार नाही. त्यामुळे निरोगी सवयी आत्मसात करा आणि स्वत:चा हार्ट अटॅक पासून बचाव करा.