विराट-रोहित नाही तर ‘हा’ आहे भारताचा या वर्षात सार्वाधिक कमाई करणारा खेळाडू
क्रीडा

विराट-रोहित नाही तर ‘हा’ आहे भारताचा या वर्षात सार्वाधिक कमाई करणारा खेळाडू

मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंपेक्षा कमाईत जसप्रित बुमराहने बाजी मारली आहे. भारतीय क्रिकेट टीमचा सगळ्यात जास्त कमाई करणारे खेळाडू म्हणून सगळ्यांसमोर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची नावं समोर येतात. यावर्षी जसप्रीत बुमराह सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू ठरला. बुमराहने विराट कोहलीला पिछाडीवर टाकलं आहे. या यादीत रोहित शर्मा टॉप-5 मध्येही नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एमएस धोनीने क्रिकेटमधून निवृत्त घेतली असली तरी तो बहुतेक क्रिकेटपटूंपेक्षा तोच जास्त कमावतो. जसप्रीत बुमराहने भारताकडून 2020 साली 4 टेस्ट, 9 वनडे आणि 8 टी-20 खेळल्या. बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंना एका टेस्टसाठी 15 लाख रुपये देतं, तर प्रत्येक वनडेला 6 लाख आणि एका टी-20 मॅचला 3 लाख रुपये देतं. त्यामुळे बुमराहने 2020 साली 1.38 कोटी रुपये कमावले. ही रक्कम बुमराहच्या कराराच्या रकमे व्यतिरिक्त आहे.

विराट कोहली भारताकडून यावर्षी 3 टेस्ट, 9 वनडे आणि 10 टी-20 खेळला. त्यामुळे विराटची मॅच खेळून झालेली कमाई 1.29 कोटी रुपये एवढी झाली. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टनंतर पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतला, त्यामुळे वर्षाची शेवटची टेस्ट विराट खेळला नाही. जर विराट ही टेस्ट खेळला असता तर त्याने यावर्षी मॅच खेळून एकूण 1.44 कोटी रुपये कमावले असते.

बुमराह आणि कोहलीनंतर रविंद्र जडेजाने भारताकडून सर्वाधिक कमाई केली. जडेजाने यावर्षी 2 टेस्ट, 9 वनडे आणि 4 टी-20 मॅच खेळल्या, त्यामुळे जडेजाने 96 लाख रुपये कमावले. तर रोहित शर्मा सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये टॉप-5 मध्येही नाही. खराब फिटनेसमुळे रोहित शर्माला यावर्षी बऱ्याच मॅच मुकाव्या लागल्या. रोहितने यावर्षभरात 3 वनडे आणि 4 टी-20 मॅच खेळल्या, त्यामुळे रोहितला मॅच खेळून 30 लाख रुपये मिळाले.