जर तुम्ही अंडी खाणं पूर्णपणे बंद केलं तर काय परिणाम होतील? जाणून घ्या काय म्हणतं विज्ञान..!
लाइफफंडा

जर तुम्ही अंडी खाणं पूर्णपणे बंद केलं तर काय परिणाम होतील? जाणून घ्या काय म्हणतं विज्ञान..!

अंडी खाण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत (health benefits of eggs) यात काही शंकाच नाही. अंडी खाण्यामुळे होणा-या फायद्यांमध्ये वजन नियंत्रित ठेवणे, डोळ्यांचे आरोग्य सुधारणे, प्रोटीन आणि ओमेगा -3 अ‍ॅसिडसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश होतो. जर अंड्याच्या पोषक तत्वांबद्दल किंवा फॅक्टबाबत (Egg nutrition facts) पाहायला गेलं तर ते प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत आहे, तसेच त्यात व्हिटॅमिन बी 12, बायोटिन, थायामिन आणि सेलेनियम असते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अंड्यांमध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो अ‍ॅसिड्स असतात, जे शरीराच्या गरजा पूर्ण करतात. हे व्हिटॅमिन ए, बी, कॅल्शियम, फॉस्फरससारख्या घटकांचे भांडार देखील आहे. रोज अंडी खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते. हाडे मजबूत होतात. पण तुम्ही अजिबात अंडी खाल्ली नाहीत तर काय होईल याचा कधी विचार केला आहे का? याविषयी विज्ञान काय सांगते ते जाणून घेऊया.

कोलेस्ट्रॉल कमी होते
एका अभ्यासानुसार, अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. याचा अर्थ अंडी न खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचा धोका कमी होतो. तुम्ही दर आठवड्याला एक अंड कमी खाल्ल्यास तुम्ही सुरक्षित राहू शकता.

पिंपल्स व ब्रेकआउटपासून बचाव होतो
मुरुम किंवा पिंपल्स हे प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या वाढण्यामुळे होतात, जे की अंड्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. जरी शरीर हे हार्मोन्स स्वतः तयार करत असले तरी अंडी खाल्ल्याने तुम्ही तुमच्या शरीरात हे हार्मोन्स जास्त प्रमाणात वाढवत असता. त्यामुळे तुमच्या त्वचेवर अचानक काही डाग दिसले तर तुम्ही किती वेळा अंडी खात आहात हे नक्की बघा.

हृदयरोगाचा धोका कमी होतो
तुम्ही रोज एक अंड खाऊ शकता जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर तुम्ही मधुमेहासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असाल तर इतकी अंडी खाल्ल्याने तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की जे पुरुष दररोज एकापेक्षा जास्त अंडी खातात त्यांना ही स्थिती विकसित होण्याचा धोका जास्त असतो.

ब्लोटिंगपासून मिळेल सुटका
काही लोकांसाठी अंडी हे उत्तम नाश्ता असू शकते, परंतु अनेकांना अंडी खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखे किंवा गॅस झाल्यासारखा जाणवू शकतो. यामुळे केवळ तुम्हाला पोट फुगण्याचीच समस्या नाही तर पोटात दुखणे, डोकेदुखी आणि तणाव या समस्या देखील जाणवू शकतात.

बद्धकोष्ठतेपासून होते मुक्ती
अंड्यांमध्ये प्रोटीन तर मुबलक प्रमाणात असतात, परंतु त्यामध्ये पचनास मदत करणारं कोणतंही फायबर नसतं. फायबरच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता होते. याचा अर्थ अंडी न खाल्ल्यास बद्धकोष्ठता टाळता येते. जर तुम्हाला अंड खायचं असेल तर ते कायम हाय फायबरयुक्त पदार्थांसोबतच खा.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.