जिओची भन्नाट ऑफर! आता सिमकार्डशिवाय कॉलिंग करता येणार; पण ते कसे?
लाइफफंडा

जिओची भन्नाट ऑफर! आता सिमकार्डशिवाय कॉलिंग करता येणार; पण ते कसे?

नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी इ-सिम (eSIM) म्हणजेच इंबेडेड सब्सक्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल होय. जे थेट फोनमध्ये एम्बेड केले जाते. यासारखी सिम फोनमध्ये दिली गेल्यास यात फोनचे स्पेस वाचते. स्वस्त प्लान्स, दर आणि लाइव्ह फोन दिल्यानंतर आता कंपनी आपल्या ग्राहकांना इ-सिम ची सेवा देत आहे. याद्वारे, ग्राहकांना प्रत्यक्ष सिमची आवश्यकता नाही आणि ते सहजपणे नेटवर्कचा आनंद घेऊ शकतात. तसेच दोन सिम ट्रे बनवण्याची गरज नाही. हे कोणत्याही मोबाइलच्या रिमोट सिम प्रोविजनिंगला इनेबल करते. eSIM च्या युजर्सला फोनमध्ये कोणतेही सिम कार्ड शिवाय टेलिकॉम सर्विस वापरता येऊ शकते. Reliance Jio युजर्संना ही सुविधा आता मिळू शकणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जर तुम्ही रिलायंस जिओ चे इ-सिम च्या नवीन कनेक्शन साठी डिजिटल किंवा जिओ स्टोरवर जावे लागेल. त्यानंतर कनेक्शन मिळवण्यासाठी आपला फोटो आणि आयडी पुरावा द्यावा लागणार आहे. इ-सिम अॅक्टिवेट करण्यासाठी सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये एक फीचर डाउनलोड करावे लागेल. eSIM च्या कम्पेटिबल डिवाइस ऑटोमेटिकली या सिमला कॉन्फ़िगर करते. चुकून तुम्ही डाउनलोड केलेल्या ईसिमला हटवले तर तुम्हाला पुन्हा जवळच्या रिलायन्स जिओच्या डिजिटल आणि जिओच्या स्टोरवर जाऊन पुन्हा त्याला अॅक्टिवेट करावे लागेल. यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला फोटो आणि आयडी पुरावा द्यावा लागेल. फिजिक सिम कार्ड ईसिमध्ये बदल करू शकतो. याचे उत्तर हो असे आहे. Reliance Jio फिजिकल सिम कार्ड ला ज्यात जिओ कनेक्शन अॅक्टिव आहे. त्याला ईसिम मध्ये बदलू शकतो.

आजकाल बऱ्याच स्मार्टफोन उत्पादक कंपन्या इ-सिम फोन लॉन्च करत आहेत. यात Apple आणि सॅमसंग आघाडीवर आहेत. Apple डिव्हाइसबद्दल बोलायचं झाल्यास iOS 12.1 किंवा त्यापेक्षा अधिकच्या डिव्हाइसमध्ये इ-सिम वापरला जाऊ शकतो. जिओच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार Apple चे Phone XR, iPhone XS, iPhone XS Max, iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max, iPhone SE (2020), iPhone 12 mini, iPhone 12, iPhone 12 Pro, और iPhone 12 Pro Max वर वापरला जाऊ शकतो.