शुभंकर तावडेचा फिल्मफेअर पुरस्काराने गौरव; तर आनंदी गोपाळ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा
मनोरंजन

शुभंकर तावडेचा फिल्मफेअर पुरस्काराने गौरव; तर आनंदी गोपाळ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यात विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत 2019ला रिलीज झालेल्या ‘कागर’ चित्रपटासाठी अभिनेता शुभंकर तावडेला अभिनयासाठी फिल्मफेअरने पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘कागर’ हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. ह्या फिल्मनंतर त्याचवर सातत्याने कौतुकाचा वर्षाव झाला. आणि आता ‘कागर’ मधल्या अभिनयासाठी त्याला फिल्मफेअरने पुरस्कार देऊन गौरविले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वांद्रे इथं या पुरस्कार सोहळा पार पडला. अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधवने आपल्या खास शेलीत सूत्रसंचालन केलं. त्याचबरोबर सोहळ्यात मराठीतील दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावत शोभा वाढवली. आपल्या पहिल्या-वहिल्या फिल्मफेअर पुरस्काराने भारावलेला शुभंकर तावडेने आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला,”फिल्मफेअर पुरस्काराची ‘ब्लॅक लेडी’ मिळवणं, हे खुपच अभिमानाचं आणि स्वप्नवत आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या प्रत्येक अभिनेत्याचे हे स्वप्न असतं. आज हे स्वप्न सत्यात उतरताना अतिशय आनंद होतोय.”

शुभंकर पूढे म्हणतो, “मला कागरचे दिग्दर्शक मकरंद माने ह्यांचे खूप आभार मानावेसे वाटत आहेत. कारण, माझ्यासारख्या नवोदित अभिनेत्यामध्ये त्यांनी कागरमधला हिरो पाहिला. मी सिनेमातला हिरो बनू शकतो. हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. माझ्या वडिलांचे (अभिनेता सुनील तावडे) मार्गदर्शनही मला सातत्याने मिळत गेल्याने मी आजवर इथवर पोहोचलो. सर्वात महत्वाचे म्हणजे, मला हा पुरस्कार मिळण्यात प्रेक्षकांचा मोठ वाटा आहे. त्यामुळे त्यांचेही आभार.” त्याचबरोबर या पुरस्कार सोहळ्यात आनंदी गोपाळ सिनेमाने बाजी मारली.

सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक सलील कुलकर्णी – वेडिंगचा सिनेमा,
सर्वोत्कृष्ट चित्रपट आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मुक्ता बर्वे – स्माईल प्लीज
सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक ललित प्रभाकर – आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक सोनाली कुलकर्णी – हिरकणी भाग्यश्री मिलिंद – आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता शशांक शेंडे – कागर
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री नीना कुलकर्णी – मोगरा फुलला
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक बाबा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक समीर विद्धवंस- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट अभिनेता दीपक डोब्रीयाल -बाबा
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार आदर्श कदम आणि वेदश्री खाडिलकर- खारी बिस्किट
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम आनंदी गोपाळ- सौरभ भालेराव, हृषिकेश दातार, जसराज जोशी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आदर्श शिंदे – खारी बिस्किट (तुला जपणार आहे)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिक शाल्मली खोलगडे- गर्लफ्रेंड
सर्वोत्कृष्ट कथा मनिष सिंग – बाबा
सर्वोत्कृष्ट संवाद इरावती कर्णिक – आनंदी गोपाळ