लसीकरणानंतर १३ जणांना फेसिअल पॅरालिसीस; आकडा वाढण्याची भीती
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लसीकरणानंतर १३ जणांना फेसिअल पॅरालिसीस; आकडा वाढण्याची भीती

इस्रायल : इस्रायलमधील १३ जणांना कोरोनाची लस घेतल्यानंतर फेशीयल पॅरलिसिस म्हणजेच चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त आहे. विनोने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलमधील आरोग्य विभागाने अशाप्रकारे लसीचे साइड इफेक्ट दिसणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनेकजण करोना लसीच्या या साईड इफेक्टमधून बाहेर आले असले तरी त्यांना हा त्रास जाणवल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मला जवळजवळ २८ तास फेशियल पॅरलिसिसचा त्रास जाणवत होता, असं व्हायनेटशी बोलताना एका व्यक्तीने सांगितलं. मात्र नंतर आपण यामधून बाहेर आल्याचेही या व्यक्तीने स्पष्ट केलं आहे. पॅरालिसिस बरा झाल्यावर आरोग्य मंत्रालयाने नियोजित वेळेनुसार दुसरा डोस देण्याचा आग्रह धरला असला, तरी आता या लोकांना शॉटचा दुसरा डोस देण्यासंदर्भातील भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतात ४४७ प्रकरणं
भारतामध्येही पहिल्या दिवसाच्या लसीकरणानंतर ४४७ जणांवर प्रतिकूल परिणाम म्हणजेच लसीचा साइड इफेक्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. राजधानी दिल्लीत शनिवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी पुरळ उमटणे, सूज येणे किंवा ताप येणे यासारखी किरकोळ लक्षणे दिसण्याची एकूण ५१ प्रकरणे आढळली. लसीचा प्रतिकूल परिणाम झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नगरमधील आठ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही करोना लसीचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लस घेतलेल्या एकूण दोन लाख २४ हजार ३०१ पैकी ४४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला. त्यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले. परंतु इतर ४४४ जणांना ताप, डोकेदुखी आणि मळमळ अशी किरकोळ लक्षणे आढळल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.