विराटने केला ट्विटरवरील माहितीत बदल
क्रीडा

विराटने केला ट्विटरवरील माहितीत बदल

नवी दिल्ली : विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. अनुष्काने काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. विराटने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यानंतर नुकताच त्याने आपल्या ट्विटरवरील बायो म्हणजेच आपल्या बद्दल देण्यात येणारी माहिती बदलल्याची गोष्ट घडली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याच्या आधीच्या बायोमध्ये विराट कोहलीचे अधिकृत ट्विटर अकाऊंट, भारतीय क्रिकेटपटू, खेळाडू, कारचा चाहता, फुटबॉल आवडणारा आणि सदैव उत्साही असा उल्लेख होता. हे सारं विराटने आता त्याच्या बायोमधून काढून टाकलं. त्याच्या जागी विराटने नवा बायो लिहिला. त्या बायोचा थेट अनुष्का आणि त्यांच्या मुलीशी संबंध आहे. विराटने नव्या बायोमध्ये लिहिले, अभिमान वाटावा असा पती आणि वडिल !

कळवण्यास खूप आनंद होत आहे की आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली, अशा आशयाचा संदेश विराट कोहलीने ट्विटरद्वारे शेअर करत कन्यारत्नप्राप्ती झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. दरम्यान, भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला की इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतून विराट संघात पुनरागमन करेल अशी माहिती देण्यात आली आहे.