परळीतील अटकेनंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
बातमी मराठवाडा

परळीतील अटकेनंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

बीड : करुणा शर्मा यांच्या गाडीत बीड दौऱ्यावर असताना पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केली. त्यांना परळी पोलिसांनी अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

परळी येथील वैजनाथ मंदिराच्या समोर दर्शनासाठी आल्यानंतर करुणा शर्मा यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या नंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पिस्तुल आढळून आली, यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

परळी शहरात करुणा शर्मा च्या पार्श्‍वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मंदिराच्या समोर करुणा शर्मा यांना अडवले. यावेळी परळीतील महिला नेत्यांना जाब विचारला होता. हे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना मंदिराच्यासमोर रोड बाहेर काढून दिले. पुन्हा मुंडे समर्थक आणि त्यांची गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप करून शर्मा यांनी केला आहे.