डॉ. आंबेडकर जयंतीनिमीत्त ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन; असा घ्या सहभाग
बातमी महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर जयंतीनिमीत्त ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन; असा घ्या सहभाग

मुंबई : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला 130वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीनिमीत्त रॅप साँग आणि गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार समितीने केले असून या स्पर्धेतील विजेत्यांसा बक्षिसही मिळणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१) गीत गायन स्पर्धा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि संविधानावर आधारित ही गीत गायन स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत भाग घेताना गीत गायन करुन व्हिडिओ गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून पाठवायचे आहेत. स्पर्धक हे व्हिडिओ कॅमेरा किंवा मोबाईलद्वारे शूट करू शकतो. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख १० एप्रिल असून १४ एप्रिल रोजी स्पर्धेच्या विजेत्यांची नावे घोषित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धकांनी पाठविलेले काही खास आणि निवडक व्हिडिओ आवाज इंडिया टीव्ही आणि आवाज म्यूजिक या चॅनलवर दाखविण्यात येणार आहेत.

स्पर्धेत पाठविण्यात येणारा कुठलाही व्हिडिओ ३ मिनीटांपेक्षा अधिक कालावधीचा नसावा याची काळजी स्पर्धकांना घ्यायची आहे. awazmusictv@gmail.com या मेल आयडीवर स्पर्धकांनी व्हिडिओ पाठवायचे आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस हे ५० हजार रुपये असणार आहे. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २५ आणि २० हजार रुपये बक्षिस असणार आहे. त्याचबरोबर प्रोत्साहनपर म्हणून आणखी ५ जणांना २ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

रॅप साँग स्पर्धा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि राष्ट्र निर्माण कार्यावर आधारित ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत २५ वर्षापर्यंत वय असणाऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेत भाग घेताना रॅप साँग शूट करुन त्याचा व्हिडिओ गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून पाठवायचे आहेत. स्पर्धक हे व्हिडिओ कॅमेरा किंवा मोबाईलद्वारे शूट करू शकतो. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख १० एप्रिल असून १४ एप्रिल रोजी स्पर्धेच्या विजेत्यांची नावे घोषित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धकांनी पाठविलेले काही खास आणि निवडक व्हिडिओ आवाज इंडिया टीव्ही चॅनलवर दाखविण्यात येणार आहेत.

स्पर्धेत पाठविण्यात येणारा कुठलाही व्हिडिओ ४ मिनीटांपेक्षा अधिक कालावधीचा नसावा याची काळजी स्पर्धकांना घ्यायची आहे. advtawazindia@gmail.com या मेल आयडीवर स्पर्धकांनी व्हिडिओ पाठवायचे आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस हे २५ हजार रुपये असणार आहे. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १५ आणि १० हजार रुपये बक्षिस असणार आहे. त्याचबरोबर प्रोत्साहनपर म्हणून आणखी ५ जणांना हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी स्पर्धक ८६००७७७१७७, ८६००७७७१८०, ८४८४९९१६५४ या क्रमांकावर संपर्क करू शकतात.