पाकिस्तानात बकरीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; नागरिकांचा इम्रान खानवर रोष
बातमी विदेश

पाकिस्तानात बकरीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; नागरिकांचा इम्रान खानवर रोष

लाहोर : पाकिस्तानच्या ओकारा येथे ५ लोकांनी एका बकरीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर बकरीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सतगारा पोलिस स्टेशनमध्ये पाच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बकरीच्या मालकाने या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोपी बकरीला निर्जन ठिकाणी घेऊन गेले होते तेथे त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असे मालकाने सांगितले. बकरीचा शोध घेताना तिचा मालक तेथे पोचल्यावर सर्व आरोपी तेथून पळून गेले असे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर येथील पोलिसांनी सर्व दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. आता ही घटना उघडकीस आल्यानंतर पाकिस्तानमधील नागरिक रोषाने पेटून उठले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी महिलांवरील अत्याचाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते आता पुन्हा चर्चेत आले आहेत. लैंगिक शोषण हे अश्लीलतेमुळे होते, जे पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीतून आले आहे असे त्यांनी म्हटले होते. यासह, त्यांनी नकाब घालणे देखील आवश्यक असल्याचे म्हटले होते. आता शेळीसोबत झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर लोकांनी सोशल मीडियावर इम्रान खान यांना त्यांच्या वक्तव्यांवरून टीका करण्यास सुरुवात केली आहे.

https://twitter.com/minal_kiani/status/1420267497341739008