पोलिस उपअधिक्षकानं भ्रष्टाचारविरोधी दिले भाषण; अन् तासाभरातच लाच घेतली म्हणून अटक
देश बातमी

पोलिस उपअधिक्षकानं भ्रष्टाचारविरोधी दिले भाषण; अन् तासाभरातच लाच घेतली म्हणून अटक

रायपूर : राजस्थानात माधोपूर येथे बुधवारी अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त भाषण दिल्यानंतर पोलीस उप-अधीक्षकाला लाच घेतल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. या कार्यक्रमात डीएसपी मीणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विशेष म्हणजे या भाषणाच्या एक तासानंतर डीएसपी मीणा यांना ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच त्यांना लाच देणाऱ्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्यालाही अटक झाली. एसीबीच्या कार्यालयात असलेल्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला खुद्द एसीबीनंच जाळ्यात अडकवल्याचं उदाहरण पहिल्यांदाच पहायला मिळालं आहे. एसीबीला अनेक प्रयत्नांनंतर डीएसपी मीणा यांच्याविरोधात पुरावे मिळाले होते. या पुराव्यांच्या आधारे एसीबीची टीम आणखी काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करु शकते.

एसीबीचे महासंचालक बीएल जोशी यांनी सांगितलं की, कोटा येथील आकाशवाणी कॉलनीत राहणाऱ्या डीएसपी भैरुलाल मीणा जे सवाई माधोपूरमधील एसबी पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. त्यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. एसबी चौकात अधिकाऱ्यांना बोलावून ते पैसे घेत असतं. त्यामुळे एसीबीची टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून होती.