दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०हजारांच्या खाली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०हजारांच्या खाली

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर हा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून मागील २४ तासात देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ६० हजारांच्या खाली आला आहे. मागील २४ तासांत ५८ हजार ४१९ नवीन रुग्ण आढळले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या ८१ दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना मृत्यूंच्या संख्येतही घट झाल्याचे दिसत आहे. मागील २४ तासात १५७६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ एप्रिलपासून दोन महिन्यांतील सर्वात कमी मृत्यूची नोंद शनिवारी झाली. तर शनिवारी एका दिवसांत ८६ हजार ६१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी ८७ लाख ६६ हजार ००९ वर पोहोचली आहे.

देशभरात आतापर्यंत २ कोटी ९८ लाख ८१ हजार ९६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ८७ लाख ६६ हजार ००९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ३ लाख ८६ हजार ७१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात ७ लाख २९ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत देशात २७ कोटी ६६ लाख ९३ हजार ५७२ जणांनी कोरोनावरील लस घेतली आहे.