जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी एकदा नेत्याला कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी एकदा नेत्याला कोरोनाची लागण

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असतानाच राष्ट्रवादीला आणखी एका नेत्याला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे, ट्विटवरून याबाबत त्यांनी माहिती दिली आहे, खडसे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे कारण नाही, गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसभरात ३ हजारापेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यसरकारचीही चिंता वाढली आहे. अशातच, एकनाथ खडसेंसोबत सून भाजपा खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता, माझा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तरी गेल्या ८ दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोविड चाचणी करून घ्यावी, माझी प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रक्षा खडसेंनी दिली आहे.

तर, राज्यात सतत वाढणाऱ्या कोरोनाचा आलेख पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ” राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून जी खबरदारी आणि जे निर्णय घेण्याची गरज वाटेल मग ते कितीही कठोर निर्णय असले तरी ते घेतले जातील. याशिवाय अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे.