देशात २४ तासांत साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची भर; ३,७५४ मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात २४ तासांत साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची भर; ३,७५४ मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी मागील २४ तासांत काही प्रमाणात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी झाले आहेत. दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. दररोज साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहे. त्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांतील आकडेवारी मागील काही दिवसांतील आकडेवारीच्या तुलनेत दिलासा देणारी असली, तरी समाधानकारक नाही. देशात रविवारी दिवसभरात तीन लाख ६६ हजार १६१ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचं संकट मात्र कायम आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन हजार ७५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ४६ हजार ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत.