महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज
देश बातमी

महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज

नवी दिल्ली : मोदी सरकारने जानेवारी २०२०पासून वाढीव महागाई भत्ताच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी मोठी भेट दिली. दीड वर्षांपासून न देण्यात आलेला महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये आता ११ टक्क्यांनी वाढव करुन थेट २८ टक्के करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सरकारने डीए १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दरवर्षी सरकारी तिजोरीतून ३४,४०१ कोटी रुपये खर्च करावा लागणार आहेत. कोरोनामुळे १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ रोजी केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना आणि पेन्शनधारकांना देत असलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या तीन हप्ते थांबण्यात आले होते. १४ जुलैला डीए देण्याचा निर्णय घेण्यात आला. तीनही हप्ते मिळून एकूण डीए वाढून २८ टक्क्यांपर्यंत जाईल, त्यात १ जानेवारी २०२० पासून आणि १ जानेवारी २०२० पासून ४ टक्के आणि १ जानेवारी २०२० पासून ४ टक्के वाढीचा समावेश आहे. याचा फायदा ५० लाखांहून अधिक कर्मचारी आणि ६० लाख पेन्शनधारकांना होईल.

घरभाडे भत्यात होणार वाढ
घरभाडे भत्ता (एचआरए) संदर्भातही सरकारने मोठी घोषणा केली आहे. महागाई भत्ता वाढवण्याच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांचा घरभाडे भत्ता (एचआरए) वाढवून २७ टक्के केला आहे. मोदी सरकारने ७ जुलै २०१७ रोजी एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की जेव्हा महागाई भत्ता (डीए) २५ टक्के ओलांडेल तेव्हा घर भाडे भत्ता (एचआरए) मध्ये सुधारणा केली जाईल. १ जुलैपासून महागाई भत्ता (डीए) २८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे घरभाडे भत्ता (एचआरए) देखील सुधारित करण्यात आला आहे.