राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; आज ५४ रुग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; आज ५४ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानतंर रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात ७ हजार ८६३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय ६ हजार ३३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ३६ हजार ७९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.८९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६४,२१,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६९,३३० (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३ लाख ५५ हजार ७८४ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. तर, ३ हजार ५५८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज एकूण ७९ हजार ०९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. देशभरात सोमवारी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसंच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केलं जात आहे.