अनिलकुमार गायकवाड यांची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम सचिव पदी नियुक्ती
बातमी महाराष्ट्र

अनिलकुमार गायकवाड यांची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम सचिव पदी नियुक्ती

मुंबई : अनिलकुमार बळिराम गायकवाड यांची सार्वजनिक बांधकाम सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक महत्वाच्या पदावर त्यांनी आतापर्यंत काम केलेले आहे. त्याचबरोबर, सध्या ते एमएसआरडीसीच्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गचे मुख्य अभियंता तथा सह व्यावस्थापकिय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय येथे सचिव बांधकामेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गायकवाड यांना उत्कृष्ट अभियंता म्हणून महाराष्ट्र शासनाने दोनवेळा गौरवित केलेले आहे. अनिलकुमार गायकवाड यांची आज सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मुंबईच्या सचिव (बांधकाम) या पदावर महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केल्याने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान गायकवाड यांनी आतापर्यंत अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. मुंबईमधील उड्डाण पुल, सी लिंक, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे, वैतरणा नदीवरील सर्वात उच लोखंडी पूल, दिल्ली येथील सुंदर असे महाराष्ट्र सदनाची वास्तू, मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचं आधुनिक पद्धतीने जतन आणि सध्या सुरू असलेलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी प्रकल्प समृध्दी महामार्ग असे अनेक प्रकल्प यशस्वी पूर्ण केलेले आहेत.