मोठी बातमी : आयपीएलमधील सट्टेबाजी उघडकीस
क्रीडा

मोठी बातमी : आयपीएलमधील सट्टेबाजी उघडकीस

नवी दिल्ली : आयपीएलमधील एका सामन्यात स्टेडियमवरील प्रेक्षागृहातून चेंडूगणिक माहिती सट्टेबाजांना पुरवल्याप्रकरणी एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सट्टेबाजांकडून या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, असा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शब्बीर हुसैन शेखादम खांडवावाला यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रत्यक्ष सामना आणि टीव्हीवरील थेट प्रक्षेपण यातील वेळफरकाचा लाभ घेऊन दिल्लीतील एका आयपीएल सामन्यात सीमारेषेबाहेरून चेंडूगणिक सट्टेबाजीला साहाय्य केल्याचे सिद्ध झाले आहे, असे खांडवावाला यांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी कोटला येथून आणखी दोघांना पकडले असून, त्यांनी २ मे रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि सनराजयर्स हैद्राबाद यांच्यातील सामन्याप्रसंगी बोगस प्रवेशपत्र बाळगले होते. यातील एका व्यक्तीकडे दोन मोबाइल आढळल्याने अधिकाऱ्याला संशय आला. कोरोनाच्या कालखंडात सामने जैव-सुरक्षित वातावरणात होत असल्याने सट्टेबाजांकडून चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना हाताशी घेतले जात आहेत, असे खांडवावाला म्हणाले.

लाचलुपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने सट्टेबाजीस माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीला तू येथे काय करीत आहेस, असे विचारले. तेव्हा त्याने प्रेयसीशी गप्पा मारत असल्याचे त्याने सांगितले. मग अधिकाऱ्याने त्याला पुन्हा फोन लावून मोबाइल देण्यास सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीने पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडण्यात आले.