कोविड-१९ रिलीफसाठी ‘या’ डॅशिंग आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती
बातमी महाराष्ट्र

कोविड-१९ रिलीफसाठी ‘या’ डॅशिंग आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती

मुंबई : राज्यासह देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असाताना कोविड-१९ रिलीफसाठी एका डॅशिंग आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासन व त्यांच्या सलंग्न संस्था तसेच राज्यशासनाच्या अधिकृत संस्था किंवा वैधानिक संस्था यासाठी मदत पुर्विण्याचे कार्य करत आहेत. यासाठी बाहेरील देशातून कोविड१९साठी मदत पाठविण्यात येत आहे. विनामूल्य आयात केलेल्या मदतकार्याचा अखंड प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी राज्यशासनाने उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोविड१९ रिलिफ आयटम सवलतीच्या उद्देशाने विनामुल्य आयातीची सोय करत असल्यास त्यांना परदेशातून आयात केलेल्या विशिष्ट कोविड१९ मदत साहित्याच्या आयातीवर आयजीएसटीची सवलत केंद्र शासनाने जाहीर केली आहेत.

प्रशासकीय पुढाकाराचा जास्तीत जास्त परिणाम घडविण्यासाठी आणि कोविडदरम्यान त्रास कमी करण्यासाठी, उद्योग विकास आयुक्त यांना नियुक्त करण्यात आले आहे. नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांकही शासनाकडून जारी करण्यात आला आहे. नोडल अधिकारी यांचा संपर्क – ०२२-२२०२८६१६/२२०२३५८४ त्याचबरोबर मेलआयडीही जारी करण्यात आला आहे. ई-मेल – didci@maharastra.gov.in