राकेश टिकैत यांचा शब्द; वचन देतो…
देश बातमी

राकेश टिकैत यांचा शब्द; वचन देतो…

गाझियाबाद : ”केंद्र सरकारने कायदे रद्द न करण्यामागची अडचण सांगावी, मी वचन देतो सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही,” असा शब्दच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांपासून एक कॉल दूर असल्याचे सांगितले. आजही कृषीमंत्र्यांनी दिलेली ऑफर खुली असल्याचे सांगत शेतकरी नेत्यांना आवाहन केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”सरकारची अशी कोणती अडचण आहे की नवीन कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाहीय? असा प्रश्न राकेश टिकैत यांनी केला आहे. सरकार शेतकऱ्यांना त्यांची बाजू सांगू शकते. आम्ही शेतकरी असे लोक आहोत जे पंचायत राजवर विश्वास ठेवतो. आम्ही कधी जगासमोर सरकारची मान शरमेने खाली जाऊ देणार नाही. सरकारसोबत आमची वैचारिक लढाई आहे. ही लढाई लाठ्या, काठ्या, बंदुकांनी लढली जाऊ शकत नाही. नाही त्याद्वारे दाबली जाऊ शकते. जेव्हा नवीन कायदे मागे घेतले जातील तेव्हाच आम्ही शेतकरी आपल्या घरी परत जाऊ, असेही टिकैत यांनी सांगितले.

सरकारसोबत आमची वैचारिक लढाई आहे. ही लढाई लाठ्या, काठ्या, बंदुकांनी लढली जाऊ शकत नाही. नाही त्याद्वारे दाबली जाऊ शकते. जेव्हा नवीन कायदे मागे घेतले जातील तेव्हाच आम्ही शेतकरी आपल्या घरी परत जाऊ. सरकार शेतकऱ्यांना त्यांची बाजू सांगू शकते. आम्ही शेतकरी असे लोक आहोत जे पंचायत राजवर विश्वास ठेवतो. आम्ही कधी जगासमोर सरकारची मान शरमेने खाली जाऊ देणार नाही, असेही टिकैत यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन थंड पडण्याची चिन्हे दिसू लाली होती. मात्र, राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर गाझीपूरसह अन्य सीमांवर शेतकरी आंदोलनाला नवे स्फुरन चढल्याचे दिसू लागले आहे. काल रात्रीपर्यंत ५०००० हून अधिक शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज गाझीपुरला पोहचू लागली. यामुळे टिकैत यांना देखील स्फुरन चढले आहे.

दरम्यानअर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी कायद्यांवर मोदी सरकारने चर्चाच केली नाही, विरोध पक्षांना महत्व दिले नाही असा आरोप या नेत्यांनी केला होता. आता यावर मोदी सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. यामुळे मोदी सरकारकडून कृषी कायद्यांवर अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दाखविण्यात आली आहे.