एनसीबीच्या कारवाईत ड्रग्स पेडलर रिगल महाकालला अटक; मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त
बातमी महाराष्ट्र

एनसीबीच्या कारवाईत ड्रग्स पेडलर रिगल महाकालला अटक; मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) ड्रग्स पेडलर रिगल महाकाल याला अटक केली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी करून एनसीबीने रिगल महाकाल याला अटक करत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक आरोपी अनुज केशवाणी याला महाकाल ड्रग्जचा पुरवठा करत असतं. त्यानंतर केशवाणी पुढे दुसऱ्यांना हे ड्रग्ज पुरवत असे, असं एनसीबीनं सांगितलं आहे. ओशिवरा भागातील मिलत नगर आणि लोखंडवाला येथे एनसीबीनं बुधवारी सकाळी ही छापेमारी केली. यामध्ये महाकाल याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने बर्‍याच फिल्म स्टार, टीव्ही स्टार्स, प्रॉडक्शन कंपन्यांशी संबंधित लोकांची चौकशी केली आहे. यापूर्वी एनसीबीने कॉमेडियन भारती सिंहच्या घरातून सुमारे 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला होता. त्यानंतर भारती आणि तिचा नवरा हर्ष यांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर भारती आणि हर्ष यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात धाव घेतली. तेव्हा त्यांना जामीन मिळाला. त्याचबरोबर चित्रपट अभिनेत्री दीपिका पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश यांच्याकडेही एकूण 1.7 ग्रॅम हॅश जप्त करण्यात आला आहे. जेव्हा करिश्माने अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. त्यावेळी तिचीही कसून चौकशी करण्यात आली होती.