5 रुपयांसाठी बापाकडून मुलीची हत्या; हट्ट ठरला जीवघेणा
बातमी विदर्भ

5 रुपयांसाठी बापाकडून मुलीची हत्या; हट्ट ठरला जीवघेणा

गोंदिया : 5 रुपयांसाठी बापाने मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संताप अनावर झालेल्या वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली आहे. या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील लोणार येथे ही घडली आहे. लोणार येथे संध्याकाळी दीड वर्षांच्या चिमुकलीनं आईकडे खाऊ घेण्यासाठी हट्ट केला. 5 रुपये खाऊसाठी या चिमुकलीला हवे होते. आईनं ही गोष्ट वडिलांना सांगितली. त्यांच्याकडे 5 रुपये सुट्टे नव्हते. 500 रुपयांची नोट 5 रुपयांसाठी मोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

खाऊ घ्यायला पैसे न दिल्यानं मुलगी हट्ट करू लागली. वडिलांनी संतापाच्या भरात चिमुकलीला अंगणात नेऊन आपटलं. या घटनेत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. याची माहिती मिळताच आईनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. 5 रुपयांसाठी वडिलांनी आपल्या काळजाच्या तुकड्याचा जीव घेतल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संतापलेल्या वडिलांनी मागचा पुढचा विचार न करता पोटच्या मुलीची क्रूरपणे हत्या केली.

आईला या प्रकरणाची माहिती मिळताच तिने न्यायासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मृत मुलीच्या आईनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.