धक्कादायक ! दहशतवाद्यांकडून ११०जणांची गळा चिरुन हत्या करत महिलांचे अपहरण
बातमी विदेश

धक्कादायक ! दहशतवाद्यांकडून ११०जणांची गळा चिरुन हत्या करत महिलांचे अपहरण

नायजेरिया : नायजेरियामधील दहशतवाद्यांकडून ११० शेतमजूरांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांचे अपहरण करण्यात आले आहे. दहशतवादी संघटना बोको हरमने हे हत्याकांड घडवून आणलं आहे. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार बोको हरम या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेने शेतात काम करणाऱ्या ११० लोकांची निर्दयीपणे हत्या केली आहे. बोको हरमच्या दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने हे कृत्य केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नायजेरियामधील संयुक्त राष्ट्राचे समन्वयक असलेल्या एडवर्ड कल्लोन यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान ११० लोकांची निर्दयीपणे हत्या केली आहे. या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मुख्य शहर असणाऱ्या मैदूगुरीपासून जवळच असणाऱ्या कोशोबेजवळ हे हत्याकांड घडलं आहे. शेतामध्ये काम करणाऱ्यांवर अचानक दहशतवाद्यांच्या एका टोळीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुरुवातील ४३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं होतं. नंतर हा आकडा ७० पर्यंत पोहचवला आणि त्यानंतर हा आकडा ११० पर्यंत गेला. सर्व सामान्य नागरिकांवर करण्यात आलेला हा हल्ला धक्कादायक असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा दिली पाहिजे असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार मजूर शेतात काम करत असताना अचानक सशस्त्र दहशतवादी तेथे आले. त्यांनी मजुरांना बांधलं आणि त्यानंतर गळा चिरुन त्यांनी हत्या केली. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मदू बुहारी यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाला धक्का बसला असल्याचे राष्ट्रपतींने म्हटले आहे.