बाबा वेंगा यांची भविष्यवाणी वाचून बसेल धक्का, वर्ष 2100 नंतर रात्र अस्तित्वात नसेल, तर 2164 या वर्षात…
देश बातमी

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी वाचून बसेल धक्का, वर्ष 2100 नंतर रात्र अस्तित्वात नसेल, तर 2164 या वर्षात…

2022 हे वर्ष संपण्यासाठी आता फक्त 4 महिने उरले आहेत. त्यामुळे नव्या संकल्पांसह 2023 या वर्षाची आतुरता लागली आहे. त्यामुळे या वर्षात न झालेली कामं पुढच्या वर्षात होतील यासाठी नियोजन केलं जात आहे. असं असताना वर्ष 2023 साठी वर्तवलेली भाकीतं चर्चेचा विषय ठरत आहेत. फ्रान्सचा भविष्यवेत्ता नास्त्रदेमस आणि बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांची भाकितांची चर्चा रंगली आहे. बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी एकूण 6 भाकीतं केली होती. त्यापैकी 2 भाकितं खरी ठरली असून 4 खरी ठरतील का? याबाबत चर्चा रंगली आहे. बाबा वेंगा यांनी 2023 आणि पुढील काही वर्षांसाठी केलेली भाकीतं वाचून धक्का बसेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बाबा वेंगाने सांगितलं आहे की, 2023 मध्ये पृथ्वी कक्षा बदलेल. 2028 या वर्षात अंतराळवीर शुक्र ग्रहावर जातील. 2043 मध्ये यूरोपमध्ये एका धर्माची सत्ता असेल. 2046 नंतर माणून 100 वर्षांहून अधिक काळ जिवंत राहील. कारण अवयव सहज बदलता येतील.

वर्ष 2100 नंतर रात्र अस्तित्वात नसेल आणि कृत्रिम सूर्य पृथ्वी प्रकाशित करेल. 2130 मध्ये एलियन्समुळे, आपण पाण्याखाली राहू शकू. तर 2164 या वर्षात प्राणी माणसारखे दिसतील.

वर्ष 2183 पर्यंत मंगळ ग्रह एक अणुशक्ती बनेल. 2256 मध्ये, एक अज्ञात अंतराळ यान पृथ्वीवर एक रहस्यमय आजार आणेल. तसेच, 2229 मध्ये, फ्रान्समध्ये एक नवीन प्रतिकार चळवळ जन्म घेईल.

वर्ष 3797 पर्यंत पृथ्वीवरील जीवन नाहीसे होईल आणि लोक नवीन ताऱ्यावर राहायला जातील. वर्ष 4509 पर्यंत लोकं शेवटी देवाला भेटतील आणि बोलतील.

वर्ष 4599 मध्ये मानव अमर होईल, तर 340 अब्ज लोकसंख्येसह 4674 मध्ये सभ्यता शिखरावर पोहोचेल आणि परकीय प्राण्यांद्वारे पुनरुत्पादन सुरू होईल. 5079 या वर्षी जगाचं शेवट होईल.

111 वर्षांपूर्वी बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांनी अनेक भाकितं केली आहेत. बाबा वेंगा यांनी वर्तवलेली काही भाकीतं खरी ठरली आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी वादळात त्यांची दृष्टी गेली, पण या भविष्यवाणीमुळे बाबा वेंगा जगभर प्रसिद्ध झाले आहेत.