धक्कादायक ! व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक
बातमी मुंबई

धक्कादायक ! व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना काहीजण मात्र मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांनी एका व्हेंटिलेटर कंपनीच्या व्हेंटिलेटर मशीन खरेदी प्रकरणी 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. तीस वेंटिलेटर मागे दहा टक्के लाच मागितली होती. या पंधरा लाख रुपयांपैकी पाच लाख रुपये डॉक्टर राजू मुरुडकर यांनी ऐरोलीतील लाईफलाईन रुग्णालयात घेतले. हे पैसे घेत असताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून डॉक्टर राजू मुरुडकर यांना रंगेहात अटक केली आहे.

ठाण्यात रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमालीचे कमी असल्याचे आढळून येत असल्याने व्हेंटिलेटर बेडची मागणी जास्त प्रमाणात येऊ लागली आहे. यामुळे ठाणे महापालिकेने व्हेंटिलेटर बेड वाढवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात डॉक्टर राजू मुरुडकर हे प्रमुख भूमिका बजावतात आणि याच अधिकाराचा फायदा घेऊन डॉक्टर राजू मुरुडकर यांनी व्हेंटिलेटर बनवणाऱ्या कंपनीकडून लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी डॉक्टर राजू मुरुडकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.