नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार
बातमी मुंबई

नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार

नवी मुंबई : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोची 4 हजार 158 घरं आणि 245 गाळे, तसेच 6 कार्यालयांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.त्यासाठी ऑनलाईन अर्ज आजपासून करता येणार आहे. नवी मुंबईत द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघरमध्ये ही घरे आहेत. या 4 हजार 158 घरांपैकी 404 घरं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता असणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार
मुंबईत घर घेणे आता सर्वसामांन्याच्या आवाक्या बाहेर गेले आहे. त्यामुळे सर्वसामांन्याचा कल हा मुंबईनजीकच्या भागात घर घेण्याकडे असल्याचे दिसून येते आहे. आपलं हक्काचं घर घेण्याच्या विचारात आणि तयारीत असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. सिडकोने मेगालॉटरी काढणार आहे. त्यासाठीची ऑनलाईन अर्ज आजपासून तुम्हाला करता येणार आहे.

सिडकोची सदनिका तसेच व्यावसायिक गाळे, भूखंडची मेगा लॉटरी आहे. सिडकोने ऑनलाईन जाहीरात प्रसिद्ध केली आहे. तर ग्राहकांना आजपासून अर्ज करता येणार आहे. एकूण 4 हजार 158 घरांसाठी, 245 दुकाने आणि 6 व्यावसायिक भूखंडाची ही लॉटरी असणार आहे.