दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट; मात्र, इस्रायली दूतावासाचा प्रतिक्रिया देण्यास नकार
देश बातमी

दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट; मात्र, इस्रायली दूतावासाचा प्रतिक्रिया देण्यास नकार

दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. या ब्लास्टमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहे. इस्रायलच्या दुतावासापासून १५० मीटर अंतरावर काही गाड्या उभ्या होत्या. याच ठिकाणी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. बॉम्ब स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीचे पोलिस कमिशनर एसएन श्रीवास्तव यांनी दिलेल्या महितीनुसार, “राजेश पायसट मार्क येथे हा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी उभ्या असेलेल्या काही गाड्यांचं नुकसान झालं आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुरूवातीच्या तपासात काही समजाकंटकांचा हात असल्याचं दिसून येत आहे,”

तर “आम्हाला ५ वाजून ४५ मिनिटांनी या ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती मिळाली. यानंतर आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही,” असं अग्नीशमन विभागाचे अधिकारी प्रेम पाल यांनी सांगितलं. हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात पोलीस उपस्थित आहेत. एकीकडे दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

तर, 5 एपीजे अब्दुल कलाम रोडवरील जिंदल हाऊसजवळ एक आईईडी ठेवला होता. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. तीन गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. संपूर्ण परिसर हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. मात्र, इस्त्रायली दूतावासाने स्फोटानंतर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.