बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; म्हणून मी आत्महत्या करत आहे…
देश बातमी

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; म्हणून मी आत्महत्या करत आहे…

द्वारका : देशभरात बलात्काराचे अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत असून अनेक तरुणी बदनामीच्या भीतीने आपले जीवन संपवत असल्याचे आपण अनेकदा पहिले आहे. मात्र अत्याचार केवळ मुलींवरच होतात असे नाही अनेकदा तरुणांना फसवण्यासाठी बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. अशीच एक घटना दिल्लीतील द्वारकामधून समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने दिल्लीच्या द्वारका परिसरात एका ४१ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या युवकाने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या सुसाईड नोटमध्ये तरुणाने त्याच्याविरोधात एका तरुणीने आणि तिच्या वडिलांनी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. ”एका महिलेने माझ्याविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा नोंद केला आहे. त्या महिलेकडून आणि तिच्या वडिलांकडून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचे त्याने म्हंटले आहे.

या प्रकरणी द्वारका येथील डीसीपी एस.के.मीणा यांनी दिलेल्या महितीनुसार, रविवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास द्वारका येथील व्यंकटेश्वर हॉस्पिटलमधून कॉल आला. गोयल खुर्द येथील रहिवासी असलेल्या दीपक सांगवान नावाच्या व्यक्तीने स्वत:ला गोळी मारली आहे. त्याक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे. घटनेची माहिती मिळताच पुढील तपासासाठी पीएसआय अरविंद शौकीन यांना पाठवण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये पोहचल्यानंतर, या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडल्याचं दिसून आलं, तो प्रकाराबाबत जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नव्हता. यानंतर पोलिसांनी जखमी तरुणाच्या आईशी संवाद साधला. यावेळी त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जात घटनास्थळी एक पिस्तुल, दोन कारतूस आणि एक रिकामी कारतूस जप्त करण्यात आली, घटनेशी निगडीत सर्व गोष्टी पोलिसांनी जमा केल्या.

पोलिसाना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली. ज्यात तरुणाने त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. रश्मी(नावात बदल) आणि तिचे वडील आनंद दत्त जे महावीर एन्क्लेवमध्ये राहतात, या लोकांनी मला हे पाऊल उचलण्यास भाग पाडलं आहे, मी रश्मीला २ लाख रुपये दिले होते, त्यानंतर मुलीने ती रक्कम चेकद्वारे मला परत केली, परंतु हा चेक बाऊन्स झाला, त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले, कोर्टाचे समन्स मिळाल्यानंतर मुलीने आणि तिच्या वडिलांनी मला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. इतकचं नाही तर रश्मीने माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप करत माझ्याविरोधात तक्रार दिली, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असं त्यांने लिहिलं होतं.